November 14, 2024 7:21 PM

views 20

राज्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.    ठाणे जिल्ह्यात आज ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक रोहन घुगे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.    सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे कणकवली शहरामध्ये आज लोकशाही दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच, रॅली आणि पथनाट्याचं सादरीकरणही करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना मतदानाचा हक्क बजावण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.    धुळे शहरात मतदार जनजा...

November 13, 2024 8:06 PM

views 11

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून  ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून  विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमतीच्या तुलनेत ही किंमत ६३ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. तर २०१४च्या तुलनेत यात जवळपास सात पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे.   या कालावधीत सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५ हजार ९०२ तक्रारी प्राप्त झाल्या...

November 13, 2024 7:16 PM

views 14

अजित पवार यांच्याशिवाय कोणतंही सरकार राज्यात स्थापन होणार नाही – नवाब मलिक

विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर, अजित पवार यांच्याशिवाय कोणतंही सरकार राज्यात स्थापन होऊ शकणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.    भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसनं राजकीय तडजोड केली आहे, मात्र शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे, असं ते म्हणाले. 

November 13, 2024 3:39 PM

views 15

राज्यात महायुतीचं सरकार येईल – गृहमंत्री अमित शाह

राज्यातली जनता ही महायुतीच्या सोबत असून या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज धुळे इथे व्यक्त केला. शिंदखेडा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीसुध्दा कमळाच्या आणि महायुतीच्या सोबत आहेत असं सांगतानाच शाह यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

November 12, 2024 7:25 PM

views 12

राज्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृती उपक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध ठिकाणी मतदार जनजागृती सुरू आहे. सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदानाची टक्केवारी वाढावी मतदान जनजागृती व्हावी यासाठी बाईक रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेनं मानवी साखळी तसंच रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं. जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे फलक लेखनाद्वारे मतदानाबाबत जनजागृती तसंच पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा झाल्या.

November 12, 2024 7:15 PM

views 18

कोकणात महायुतीला ६०हून अधिक जागा मिळतील – विनोद तावडे

लोकसभा निवडणुकीत मविआने फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. पण विधानसभेवेळी मतदारांनी हा डाव ओळखला आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात महायुतीला साठहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज कणकवली इथे व्यक्त केला.

November 12, 2024 7:54 PM

views 19

महायुती सत्तेत आल्यावर विकासाचा वेग दुप्पट होणार, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता एक आठवडाच शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करुन आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत.    महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाली असून विमानतळ, महामार्ग, डिजिटल कनेक्टिव्हीटी, सिंचन, लोहमार्ग, वंदे भारत ट्रेन असा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे...

November 12, 2024 7:09 PM

views 21

काँग्रेस विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप

महायुतीचं सरकार हवं, असा जनतेचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूर इथं जाहीर सभेत म्हणाले. काँग्रेस आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असून विविध समाजात फूट पाडण्याचा, विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.    महाराष्ट्राला स्थिर आणि विकासाची दृष्टी असणाऱ्या सरकारची गरज असून महायुती सत्तेत आल्यावर दूरगामी योजना आखेल असं मोदी म्हणाले.   महायुती सत्तेत आल्यावर राज्याच्या विकासाचा व...

November 12, 2024 7:46 PM

views 16

महायुतीने सुरू केलेल्या योजना मविआने बंद पाडण्याचा प्रयत्न केला – मुख्यमंत्री

महायुती सरकारने राज्यात विविध विकासकामं केली. महाविकास आघाडीने सरकारने राज्याला वनवास दिला. पण, महायुतीने सुरू केलेल्या योजना मविआने बंद पाडण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसोड इथे केली. महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. महायुतीविषयी कुणीही दिशाभूल केली तरी त्याला फसू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

November 11, 2024 7:42 PM

views 23

आचारसंहिता लागू झाल्यापासून ४९३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर सी व्हिजिल ऍपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कर्यालयानं दिली आहे.