November 19, 2024 1:47 PM

views 15

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४,१३६ उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ३ हजार ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि २ तृतीयपंथी आहेत.    बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक ३४ उमेदवार रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी १७ उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. उत्तर नांदेड मतदारसंघामध्ये ३३, जालन्यात भोकरदनमध्ये ३२, बीडमध्ये ३१ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. नंदूरबार जिल्ह्यातल्या शहादा मतदार संघात सर्वात कमी ३ उमेदवार रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुड...

November 19, 2024 8:51 AM

views 46

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

२० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांसाठी तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून; त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातल्या २८८ जागांसाठी ४१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानची वेळ असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ...

November 18, 2024 7:51 PM

views 26

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

महाराष्ट्रात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रं उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान होईल. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार पात्र ठरले आहेत.    झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यास...

November 18, 2024 7:29 PM

views 26

जगात भारत पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला – जे. पी. नड्डा

जगात भारत पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन इतकी बनवायची असेल तर महायुतीला मतदान करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी मुंबईत केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

November 18, 2024 6:58 PM

views 11

राज्यात आता प्रचारसभा, मिरवणुका आयोजित करता येणार नाही-निवडणूक अधिकारी कार्यालय

राज्यात आता प्रचारसभा, मिरवणुका आयोजित करता येणार नाही. आयोजित केल्या तर आयोजक आणि सहभागी होणारे अशा दोघांवर गुन्हे दाखल होतील. यात दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.  या कालावधीत जाहिराती करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारण करणाऱ्यांना दिले आहेत. 

November 18, 2024 1:23 PM

views 11

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आज प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असून ते बेलापूर, सोलापूर  आणि अहिल्यानगर इथं प्रचारसभा घेतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज दुपारी नागपूर आणि नंतर वर्धा इथं जाहीर सभा घेतील. सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचारसभा घेतली. मणिपूरमध्ये तणाव असताना देशाचे प्रधानमंत्री मात्र परदेशात फिरत आहेत, अशी टीका खरगे यांनी या सभेत केली...

November 18, 2024 1:20 PM

views 16

महायुतीमुळे ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

राज्यातल्या ५ लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार, महागाई, महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत, असं सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला.   धारावी पुनर्विकास प्रकल्पासह विमानतळं, ...

November 18, 2024 10:02 AM

views 21

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.   प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन मुख्य ...

November 15, 2024 7:31 PM

views 15

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृतीला जोर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर संदेश प्रकाशित झाले आहेत. २७ लाख बँक ग्राहकांना मतदान करण्याचं आवाहन एसएमएसद्वारे केलं आहे. संकल्पपत्रांचं वितरण, स्टिकर्स, होर्डिंग, डिजिटल स्क्रिन तसंच बॅनरद्वारा जनजागृती केली जात आहे. निवडणुकीसाठी मुंबईत ६५ मतदार मदत केंद्रं उपलब्ध केली आहेत.

November 14, 2024 7:27 PM

views 17

२० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सेवांमध्ये वाढ

येत्या २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट या सार्वजनिक सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले आहेत. मुंबई आणि मुंबईतल्या उपनगरांसाठी या वाहतूकसेवा महत्वाच्या असून याबाबतची विनंती दहिसर १५३ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी शीतल देशमुख यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजल्यापासून ते २१ नोव्हेंबरपर्यंत पहाटे १ वाजेपर्यंत या वाहतूकसेवा सुरू राहणार आहेत. याचा फायदा निवडणूक कर्मचाऱ्यांसह मतदारांनाही होणा...