November 20, 2024 6:49 PM

views 13

बीड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं निधन

बीड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.  सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात एका मतदाराचा मतदान करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तसंच डांगेघर मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला.  बीड जिल्ह्यात परळी मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. शहरातल्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आल्याचं ...

November 20, 2024 6:46 PM

views 31

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झालं तरी मर्यादित ठिकाणी गैरवापर झाले. त निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली.  नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी दिली. कांदे यांनी मतदारांना एका बसमध्ये बसवून मतदान केंद्रावर आणल्याबद्दल भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा वाद झाला.  मुंबईतल्या दिंडोशी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि...

November 20, 2024 6:43 PM

views 13

विधानसभेसाठी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध क्षेत्रातील नामवंतांनी मतदानाचा हक्क बजावला

विधानसभेसाठी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध क्षेत्रातील नामवंतांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रक्ष...

November 20, 2024 1:50 PM

views 21

राज्यात विविध लक्षवेधी मतदान केंद्र

राज्यात विविध ठिकाणी लक्षवेधक मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यात महिला विशेष, युवक विशेष, दिव्यांग विशेष, हरित अशा विविध प्रकारची मतदान केंद्र आहेत. काही मतदान केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.   राज्यातली पहिल्या क्रमांकाची मतदार रविता पंकज तडवी हिनं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रथम क्रमांकाच्या मणिबेलीतल्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वडाळा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हरित मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या पहिल्या पाच मतदारांना रोप आणि फूल देऊन त्यांचं स्वागत झालं....

November 20, 2024 8:32 AM

views 19

राज्यातील ४२६ मतदान केंद्रांचं संचलन नारीशक्तीकडे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांचं संपूर्ण नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये 33, गोंदिया 32, सोलापूर 29 आणि मुंबई उपनगरामध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अशी केंद्र उभा...

November 19, 2024 7:58 PM

views 19

मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार

मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली. मेट्रोनंही अतिरिक्त वेळेत सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबईत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना त्यांच्या घराजवळून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थाही उपलब्ध सोयही आहे.   यंदा मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वत्र मतदान केंद्रांची माहिती देणाऱ्या...

November 19, 2024 6:51 PM

views 17

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी रवाना

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी रवाना झाले आहेत.  नागपूरमध्ये सर्व मतदान केंद्रावर कर्मचारी आणि सुरक्षा बलं पोहोचली आहेत. भंडाऱ्यात एसटी महामंडळान १३४ बस दिल्या आहेत. ५ हजार २३६ निवडणूक कर्मचारी आणि १४०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. गोंदियात बाराशे ८५ मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य पोहोचलं.  नाशिक जिल्ह्यात ४ हजार ९२२ मतदान केंद्रासाठी २७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  धाराशिव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेसाठी सोळाशे पोलीस, साडे चौदाशे होमगार्ड तैना...

November 19, 2024 3:21 PM

views 15

उद्या होणाऱ्या मतदानाकरता मतदान यंत्र मतदान केंद्रावर रवाना

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली असून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.      नागपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी पोहोचले आहेत. सर्व केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र दल आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत.      भंडारा जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्र रवाना झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाने १३४ बस सज्ज ठेवल्या आहेत. या गाड्यांमधून निवडणूक साहित्य मतदान केंद...

November 19, 2024 1:27 PM

views 18

मतदानाचं प्रमाण वाढण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपाययोजना

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत ६३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१ पूर्णांक १ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ पूर्णांक ३३ शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा सर्वसाधारण कल आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.    यंदा मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी विविध ...

November 19, 2024 1:29 PM

views 10

राज्यात २८८ मतदार संघांमध्ये १५८ पक्षांकडून २,०५० उमेदवार रिंगणात, उर्वरित २,०८६ अपक्ष

राज्यातल्या २८८ मतदार संघांमध्ये १५८ पक्षांकडून २ हजार ५० उमेदवार रिंगणात आहे. उर्वरित २ हजार ८६ अपक्ष आहेत. सर्वाधिक २३७ उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून वंचित बहुजन आघाडीचे २०० उमेदवार रिंगणात आहेत. भाजपानं १४९, मनसेनं सव्वाशे, काँग्रेसनं १०१ उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ९५, शरद पवारांकडून ८६, एकनाथ शिंदेंकडून ८१, अजित पवारांकडून ५९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाकडून ९३, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून ३२, प्रहार जनशक्तीचे ३८, माकपाचे ३...