November 23, 2024 7:43 PM

views 20

विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेक महत्त्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का

यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेक महत्त्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्काही दिला. त्यात काँग्रेसचे संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण, काँग्रेसमधून बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष निवडणूक लढवलेले राजेश लाटकर, शिवसेनेचे वरळीचे उमेदवार मिलिंद देवरा, मुंबादेवीतून शायना एन. सी., शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे, राष्ट्रवादीचे मानखुर्द-शि...

November 23, 2024 7:41 PM

views 15

विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवण्यात यश

या विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवण्यात यश आलं. भाजपाचे विजयकुमार गावित नंदुरबारमधून, गिरीश महाजन जामनेरमधून, देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून, श्रीजया चव्हाण भोकरमधून, संतोष दानवे भोकरदनमधून, अतुल सावे औरंगाबाद पूर्वमधून, सुहास कांदे नांदगांवमधून, रवींद्र चव्हाण डोंबिवलीतून, गणेश नाईक ऐरोलीतून, राम कदम घाटकोपर पश्चिममधून, आशीष शेलार वांद्रे पश्चिममधून, राधाकृष्ण विखे-पाटील शिर्डीतून, नितेश राणे कणकवलीतून विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमश्या...

November 23, 2024 7:39 PM

views 32

सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला यश-मुख्यमंत्री

सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. सर्वांगीण विकास करताना सर्व घटकांचा विचार केला आणि लाडकी बहीणसारख्या योजना दिल्याचं त्यांनी सांगितलं.  योजना फक्त कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणीही केल्याचं ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार हेही उपस्थित होते. मोदी सरकारच्या पाठबळामुळे हा विजय शक्य झाल्याचं फडनवीस यां...

November 23, 2024 7:16 PM

views 24

महायुतीचा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय- प्रधानमंत्री

महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, राज्यातल्या मतदारांचे विशेषत: महिला आणि युवकांचे आभार मानले.

November 23, 2024 7:09 PM

views 20

महाविकास आघाडीतल्या पक्षांना मतदारांनी नाकारलं, काँग्रेसला अवघ्या १५ जागा

महाविकास आघाडीला ४५ जागा मिळतील असं चित्र आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १६ जागांवर जिंकला असून ४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ९ जागांवर विजयी झाला असून ६ जागांवर आघाडी घेऊन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ६ जागांवर विजयी झाला असून ४ जागांवर आघाडीवर आहे.

November 23, 2024 7:09 PM

views 34

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय

महाराष्ट्रातल्या जनतेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश दिलं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या.    आतापर्यंत १९६ जागांचे निकाल हाती आले आहेत. एकूण २८८ पैकी २२८ जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळतील असं चित्र आहे. त्यातला विचार करता भाजपाला ८० जागांवर विजय मिळाला असून ५० जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. शिवसेनेला ३९ जागांवर विजय मिळाला असून १८ जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ३३ जागांवर विजय मिळाला असून ८ जागांवर ...

November 23, 2024 10:42 AM

views 19

आतापर्यंत १७७ जागांचे कल हाती, त्यात सर्वाधिक ६१ जागांवर भाजप आघाडीवर

आतापर्यंत १७७ जागांचे कल हाती आले आहेत. त्यात सर्वाधिक ६१ जागांवर भाजप आघाडीवर आहे. दहिसर मतदार संघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर  भाजपच्या उमेदवार मनिषा चौधरी त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे विनोद घोसाळकर यांच्या पेक्षा १ हजार ६२३  मतांनी आघाडीवर आहेत.   पालघर मतदार संघात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर  शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित, त्यांचे  निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जयेंद्र दुबळा यांच्या पेक्षा १०२ मतांनी आघाडीवर आहेत.  मावळ मतदा...

November 23, 2024 10:46 AM

views 21

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या टपाली मतमोजणीला विविध केंद्रांवर सुरुवात

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या टपाली मतमोजणीला विविध केंद्रांवर सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने, हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील हे टपाली मतमोजणीत आघाडीवर आहेत.  जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील आघाडीवर आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोक...

November 21, 2024 7:05 PM

views 20

मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्याची आघाडी, तर गडचिरोली जिल्हा ठरला लक्षवेधी

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्यानं आघाडी घेतली असली तरी  गडचिरोली जिल्ह्यानं सर्व राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या जिल्ह्यात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदानाची नोंद करण्यात आली आहे. इथल्या जनतेला विकासाचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि बंदुकीच्या गोळीला मतदानानं उत्तर देण्याचं आवाहन त्यांना करण्यात आलं, त्यामुळे संदेशाचा सकारात्मक परिणाम दिसून आला, अशी माहिती इथल्या  अधिकाऱ्यांनी  दिली.

November 21, 2024 1:13 PM

views 30

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ६५ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल. त्यानुसार या टक्केवारी आणखी १-२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत ७१ पूर्णांक ६९ टक्के मतदारांनी मताधिकार बजावला होता.    राज्यात सर्वाधिक सव्वा ७६ टक्...