December 2, 2024 6:46 PM

views 24

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातल्या मतदानात तफावत

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातलं मतदान यात तफावत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत  बोलत होते.    यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी उदाहरणादाखल समोर मांडली. ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून घेतल्याचं सरदेसाई म्हणाले.

December 2, 2024 1:45 PM

views 18

ईव्हीएममध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्यांवर कठोर कारवाई – मुख्य निवडणूक अधिकारी

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोकलिंगम यांनी दिला आहे. ईव्हीएम गैरव्यवहारांबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत आरोप केले जात आहेत, त्याचवेळी चोकलिंगम यांनी हे विधान केलं आहे. या प्रकरणी अधिकारी सखोल तपास करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. परदेशात वास्तव्यास असलेल्या आणि ईव्हीएममध्ये घोटाळा झाल...

December 1, 2024 7:05 PM

views 28

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली फेरमतदानाची मागणी फेटाळली

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवली गेली असं सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची फेरमतदानाची मागणी फेटाळली आहे. मारकडवाडीतल्या ग्रामपंचायतीने मतदान प्रक्रियेची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा फेरमतदानाच्या मागणीचा ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटवर होणारं मतदान योग्य आहे की नाही, याची मॉकपोलव्दारे चाचणी दोन्ही बाजूच्या उमेवारांच्या उपस्थितीत झाली. त्यावरचे आक्षेप तेव्हा नोंदवले नाहीत ते...

December 1, 2024 5:03 PM

views 33

ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तिविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तिविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समा...

November 25, 2024 6:46 PM

views 26

विधानसभा निवडणुकीत यशाचं श्रेय तिघांना एकसमान-प्रफुल पटेल

विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र म्हणून काम केलं, त्यामुळे यशाचं श्रेय या तिघांना एकसमान आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करुन मुख्यमंत्रीपदाविषयी निर्णय घेतील आणि त्यामुळे यावरून संघर्ष निर्माण होणार नाही, असंही ते म्हणाले. 

November 25, 2024 6:42 PM

views 15

राज्यात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेतानिवड अद्याप बाकी आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून ती झाल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल, असं अजित पवार ...

November 24, 2024 3:18 PM

views 27

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होणार

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपेल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं, तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरच्या अंतिम आकडेवारीनुसार २८८ पैकी २३० जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला १३२ जागां...

November 23, 2024 8:19 PM

views 21

विविध राज्यांतल्या विधानसभांच्या एकंदर ४८ पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट

याशिवाय, विविध राज्यांतल्या विधानसभांच्या एकंदर ४८ पोटनिवडणुकांचे निकाल आज स्पष्ट झाले. आसाममधल्या पाचपैकी तीन जागांवर भाजपानं, तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि आसोम गण परिषद या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. बिहारमधल्या चारपैकी दोन जागी भाजपानं, तर प्रत्येकी एका जागेवर हिंदुस्तानी आवाम मोर्चा सेक्युलर आणि संयुक्त जनता दलानं बाजी मारली आहे. छत्तीसगड आणि गुजरातमधल्या प्रत्येकी एका जागेवर भाजपाची सरशी झाली आहे. कर्नाटकातल्या तिन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. केर...

November 23, 2024 8:07 PM

views 15

विधानसभेचे आज दिसत असलेले निकाल पूर्णपणे अविश्वसनीय-रमेश चेन्नीथला

विधानसभेचे आज दिसत असलेले निकाल पूर्णपणे अविश्वसनीय, अस्वीकारार्ह असून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांशी त्याचा काहीही ताळमेळ नाही, असं मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मतदानोत्तर कल चाचण्यांमध्येही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात आमचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. यावर विश्वास कसा ठेवायचा? लोकसभेच्या निवडणुकीत पाचच महिन्यांपूर्वी जनतेनं महाविकास आघाडीला भरपूर प्...

November 23, 2024 7:58 PM

views 34

विधानसभा निवडणुकीत यंदा युवा चेहऱ्यांना विधानसभेत जाण्याची संधी

अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.    काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी ख...