March 4, 2025 8:39 PM March 4, 2025 8:39 PM

views 11

विधीमंडळात दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. आझमी यांनी मुघल शासक औरंगजेब याच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याचा आरोप करत सत्ताधारी आमदार महेश लांडगे, अतुल भातखळकर, गुलाबराव पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी केली. गदारोळ वाढल्यामुळे विधानसभा अध्यक्...

November 1, 2024 3:20 PM November 1, 2024 3:20 PM

views 12

राज्यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या ४७ हजाराच्या वर

  राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. यामध्ये १८ ते १९ वयोगटातले एकूण २२ लाख २२ हजार ७०४, तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.   राज्यातल्या एकूण मतदारांमध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला, तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रं उभारली जाणार आहेत. यापैकी शहरी भागात ४...

July 11, 2024 7:20 PM July 11, 2024 7:20 PM

views 16

अंगणवाडी उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात प्रस्ताव – मंत्री आदिती तटकरे

राज्यात अंगणवाडी उभारणी, दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मोनिका राजळे यांनी उपस्थित केला होता. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषद निधी, जिल्हा नियोजन समितीच्या निधीद्वारे दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जातात असं तटकरे यांनी सांगितलं.   ऑटोरिक्षा, टेम्पो आदी वाहनांच्या परवाना नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास पन्नास रुपये...

July 11, 2024 7:03 PM July 11, 2024 7:03 PM

views 15

संसदेत आणि विधिमंडळात सर्वपक्षियांनी मैत्रीपूर्ण संवाद ठेवण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

संसदेत आणि विधीमंडळात सर्व पक्षीयांमध्ये संवादाची गरज आहे. सर्वांनी परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संवाद ठेवावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. ते आज मुंबईत विधानभवनात राज्य विधीमंडळाच्या सदस्यांना संबोधित करत होते. सर्वांनी आत्मपरीक्षण करावं, सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तरच जनतेच्या समस्या सोडवू शकतात. त्यामुळे लोकांच्या भल्यासाठी काम करा असं आवाहन त्यांनी केलं.   संसद आणि विधीमंडळ ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त क...

July 11, 2024 7:07 PM July 11, 2024 7:07 PM

views 17

सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती  देऊन  त्यांचं  थकित वीजबिल माफ करावं, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ झाली  आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.   निर्यात बंदी, शेतमालाला भाव नसणं, कर्जाचा वाढता बोजा, पीकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक, खतं, बियाणं, शेती अवजारे यांचे वाढलेले दर, तसंच ...

July 10, 2024 7:07 PM July 10, 2024 7:07 PM

views 13

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ, गोंधळातच पुरवणी मागण्या मंजूर

विधिमंडळ अधिवेशनात आजच्या दिवशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घोषणाबाजीतच दोन्ही सभागृहांमध्ये पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करूनही शांतता प्रस्थापित न झाल्यानं विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेत काही विधेयकं मंजूर झाली. त्यानंतर विधानसभेचं कामकाजही दिवसभरासाठी थांबवण्यात आलं. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं का, यावर विरोधी प...

July 5, 2024 3:16 PM July 5, 2024 3:16 PM

views 8

महाराष्ट्रालाही विशेष दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार – अर्थमंत्री अजित पवार

  बिहार आणि आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. भविष्यात उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरील चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारने घालून दिलेल्या ३ टक्क्याच्या मर्यादेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. २०२८ पर्यंत राज्याची ...

June 29, 2024 9:26 AM June 29, 2024 9:26 AM

views 17

महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर

महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. महिला, शेतकरी, दुर्बल घटक आणि युवकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महसुली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये; तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी रुपये अपेक्षित आहे. महसुली तूट २० हजार ५१ कोटी रुपये, राजकोषीय तूट १ लाख १० हजार ३५५ कोटी रुपये आहे. विधानपरिषदेत अर्थराज्यम...

June 28, 2024 7:32 PM June 28, 2024 7:32 PM

views 16

राज्याच्या सादर झालेल्या अतिरीक्त अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका

फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे, असा आरोप त्यांनी केला.     हा अर्थसंकल्प आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असून  त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता त्यांची लूट करण्यात आली  आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.    दिशाभूल करणारा अर्थसंकल्प अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...

June 28, 2024 7:25 PM June 28, 2024 7:25 PM

views 13

‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ असा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिशय प्रगतिशील, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली.    शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा क्रांतीकारक निर्णय घेत बळीराजाच्या कष्टाचा आदर आणि सन्मान या अर्थसंकल्पात केल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं.