January 17, 2026 1:29 PM

views 21

प्रधानमंत्र्यांनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोककल्याणकारी कारभारावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.   राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश म्हणजे व्यापक हिंदुत्व, पारदर्शकता, समावेशक विकासाला महाराष्ट्रानं दिलेला कौल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.   मनसेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे. ही निवडणूक सोपी नव्हत...

January 16, 2026 7:37 PM

views 16

काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला समाधानकारक यश मिळालं नसलं तरी जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा निर्धार या जोरावर काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा इथं बोलताना दिली. या निवडणुकांमधे काँग्रेसचे एकूण साडेतीनशे नगरसेवक आणि ५ शहरांमधे महापौर असतील असं ते म्हणाले.

January 15, 2026 1:39 PM

views 54

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमधे आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे १७ पूर्णांक ७३ शतांश  टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवरच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत सुरु आहे.   राजधानी मुंबईत मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेत. मुंबईत एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र असून केंद्रांसभोवतालच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सकाळी साडेनऊ पर्यंत मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एक...

January 14, 2026 1:24 PM

views 39

नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वलस्थानी

निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे.  निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा चौथा निर्यात सज्जता अहवाल निती आयोगाने आज जाहीर केला.  २०२४ या वर्षातल्या डेटावर आधारित या अहवालानुसार  महाराष्ट्रानंतर तामिळनाडू , गुजराथ, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश कर्नाटक आणि पंजाब या राज्याचा नंबर लागतो तर लहान आकाराच्या राज्यांमध्ये उत्तराखंड निर्यातसज्जतेत पहिल्या क्रमांकावर आहे. 

January 12, 2026 2:51 PM

views 386

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची  निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मतदान यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगानं ३१ जानेवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी, अशी विनंती केली होती. आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हापरिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची निवडणूक १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. उर्वरित २० जिल्हापरिषदांच्या निवडणुकांच्...

January 3, 2026 1:49 PM

views 233

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात साडे ३७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी  सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल मुख्यमंत्र्यांनी  त्यांना शुभेच्छा दिल्या.     राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज रश्मी शुक्ला यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. तत...

January 3, 2026 9:48 AM

views 81

Municipal Election : अंतिम उमेदवार यादी आज जाहीर होणार

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. आज निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर, अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर अनेक ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे. सर्वच राजकीय पक्षात बंडखोरी झाली असून त्याचा फटका बसू नये म्हणून, अर्ज मागं घेण्यासाठी बंडखोरांची समजूत काढल्यानंतर, बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. परिणामी काही उमेदवार बिनविरो...

January 2, 2026 7:34 PM

views 14

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळणार!

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं, यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचे वाण तयार करणार असल्याचं, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक इथं म्हणाले. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या  तृणधान्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा,  यासाठी कृषी  उत्पादनांचे  प्रमा...

January 2, 2026 7:41 PM

views 157

राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी  उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदवार बिनविरोध आहेत. उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल.    उमेदवारी मागे घेण्याच्या घडामोडींमुळे ठाणे शहरात शिवसेनेच्या  पाच उमेदवारांना प्रतिस्पर्धी उरलेले नाहीत....

January 2, 2026 7:41 PM

views 51

उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

राज्यात होत असलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीतल्या  नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर , उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी  दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही, याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश निवडणूक आयोगानं संबंधित महानगर पालिकांना दिले आहेत.