December 6, 2024 7:00 PM December 6, 2024 7:00 PM
17
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दल मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या दीक्षाभूमीतल्या यात्री निवासात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंगोली जिल्ह्यातही विविध ठिकाणी अभिवादन सभा तसंच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वाशिम शहरातल्या विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज पहाटे कॅण्डल रॅली...