February 25, 2025 1:37 PM February 25, 2025 1:37 PM

views 7

महाशिवरात्रीच्या पर्वावर महाकुंभ मेळ्याचा समारोप

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं संगमावर सुरु असलेल्या महाकुंभ पर्वाचा उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप होणार आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात आज दुपारी १२ वाजेपर्यंत ६८ लाखापेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं. अमृतस्नान करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं वाहतुकीचं नियमन केलं आहे.   प्रयागराज मध्ये नियमित स्वच्छता केली जात असून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मांदर यांनी सांगितलं. दरम्यान, प्रयाग...

February 17, 2025 9:50 AM February 17, 2025 9:50 AM

views 8

महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महाकुंभ मेळयासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी आणि अतिरिक्त गर्दीच नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काल 4 विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या दुपारी 3 ते रात्री 9 दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत. आज पाच गाड्या सोडण्यात येणार आहेत .   दरम्यान, काल महाकुंभ मेळयात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1 कोटी 36 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केल 13 जानेवारीपासून कालपर्यंत 52 कोटी 83 लाख भाविकांनी स्नान केल्याची नोंद झाली आहे.  

January 27, 2025 1:17 PM January 27, 2025 1:17 PM

views 8

गृहमंत्री अमित शहा प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. त्रिवेणीसंगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथल्या शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत.   दरम्यान, परवा २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेळा क्षेत्रात  वाहन प्रवेशाला बंदी  आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आ...

January 21, 2025 10:03 AM January 21, 2025 10:03 AM

views 7

महाकुंभ : परराष्ट्र मंत्रालय आणि उत्तरप्रदेशातील अधिकाऱ्यांचा परदेशी पत्रकारांशी संवाद

उत्तरप्रदेशात प्रयाग राज इथ सुरू असलेल्या महकुंभमेळयाबद्दल सर्वंकष माहिती देण्यासाठी काल नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि उत्तरप्रदेशातील अधिकाऱ्यांनी परदेशातून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या विविध देशांच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाकुंभ मेळ्याच आध्यात्मिक , सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व समजावून सांगितलं. जगातील कोणत्याही मोठ्या जागतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सर्वात जास्त सहभागी होणाऱ्या नागरिकांपेक्षाही जास्त नागरिक म्हणजेच सुमारे ४५ कोटी नागरिक यामध्ये सहभागी ...

January 13, 2025 8:56 PM January 13, 2025 8:56 PM

views 4

उत्तर प्रदेशात महाकुंभ मेळ्याला सुरुवात, पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांचं अमृत स्नान

महाकुंभ मेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं पौष पौर्णिमेच्या पहिल्या अमृत स्नानानं सुरुवात झाली. या महाकुंभ मेळ्याच्या पहिल्या दिवशी स्नानासाठी आलेल्या भाविकांचं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आलं. २६ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्री पर्यंत चालणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी लाखो भाविक जमले असून आज दीड कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं वृत्त आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलं आहे.   प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ हा ज...

January 11, 2025 8:23 PM January 11, 2025 8:23 PM

views 8

महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वैद्यकीय सुविधा

सोमवारपासून प्रयागराज इथं सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.  मेळ्याच्या ठिकाणी ५ हजार ओपीडी उघडण्यात आल्या असून, यात रोज दहा हजार लोकांना तपासलं जाईल. तसंच तीन लाखापर्यंत चष्म्यांचं वाटप केलं जाणार असून नेत्रदान शिबीरही आयोजित करण्यात येणार आहे. परेड मैदानावरल्या सेंट्रल हॉस्पीटलमध्ये शंभर खाटांची व्यवस्था केली आहे. इथं ओपीडीपासून आयसीयूपर्यंत सर्व सुविधा असतील. अरैल इथले सब सेंट्रल हॉस्पीटल, प्रयागराज जंक्शन, नैनी आणि सुबेदारगंज...

January 5, 2025 1:58 PM January 5, 2025 1:58 PM

views 9

महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे १३,००० गाड्या सोडणार

उत्तर प्रदेशात प्रगायराज इथं होणार असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि यात्रेकरुंच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे १३ हजार गाड्या चालवणार आहे. यात १० हजार नियमित आणि ३ हजार विशेष गाड्यांचा समावेश आहे. कुंभमेळ्या आधी आणि नंतर दोन ते ती अतिरिक्त दिवस असे मिळून ५० दिवस या गाड्या चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनानं दिली आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येनं भाविक आणि यात्रेकरू येण्याची शक्यता गृहीत धरून गर्दी टाळण्यासाठी लोकांची वर्दळ एकमार्गी ठेवण्याचं नियोजन केलं असल्याचंही रेल्व...