August 21, 2024 7:18 PM August 21, 2024 7:18 PM

views 8

ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या निधनामुळे मराठी भाषेचं ऐश्वर्य वाढवणारा साहित्यिक आपण गमावला आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. निपाणीसारख्या परिसरात राहून मोरे यांनी मराठी भाषेची श्रीमंती जगभर पोहोचवली. सीमाभागातल्या मराठीचा लहेजा, शैली आणि मराठी संस्कृतीचं महत्वाचं चित्रण त्यांच्या लिखाणात येतं, मराठी भाषकांसाठी मोरे यांचं लिखाण नंदादीपासारखं तेवत राहील, असं मुख्यमंत्री म्हणाले.