March 27, 2025 2:58 PM March 27, 2025 2:58 PM

views 13

महाड वसाहतीतुन ४७ किलो अंमली पदार्थ जप्त

महाराष्ट्रातल्या महाड औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थांचं उत्पादन करणारा एक कारखाना राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं उघडकीस आणला असून या कारखान्यातून ४७ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत.   या प्रकरणी दोघांना मुंबईच्या भांडूप भागातून २२ मार्च रोजी ताब्यात घेतल्याची माहिती पथकानं दिली. हे दोघे सध्या जामीनावर बाहेर असल्याचंही पथकानं सांगितलं आहे. 

March 20, 2025 6:44 PM March 20, 2025 6:44 PM

views 17

महाड परिसरात भीमसृष्टी निर्मिती करण्याची घोषणा

महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केली. ते आज महाड इथं चौदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. तर, चौदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषीत झालेल्या ७ कोटी रुपयांची, तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाची तीन कोटी रुपयांची कामं तातडीनं सुरू केली जातील, अशी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा केली.    महाडमध्ये आज चौदा...