January 22, 2026 7:20 PM
12
दावोसमध्ये यंदा राज्याचे ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार
दावोस दौऱ्याच्या माध्यमातून राज्यात ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दूरस्थ पद्धतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या गुंतवणूकीपैकी ८३ टक्के करार थेट परकीय गुंतवणुकीचे आहेत. १६ टक्के गुंतवणूक ही परकीय कंपन्यांची आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यात उद्योग, सेवा, कृषि, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. देशात ज्या घटकांची आयात होते, त्यासाठी पर्यायी घटकांच्या निर्मित...