February 3, 2025 2:44 PM February 3, 2025 2:44 PM

views 9

महाकुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता. अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिरला यांनी सांगितलं. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या ...

January 27, 2025 9:34 AM January 27, 2025 9:34 AM

views 7

महाकुंभमेळा क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित

येत्या २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेला क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्त गर्दी असलेल्या भागात जलद प्रतिसाद पथकं तैनात करण्यात आली आहेत.   महाकुंभ मेळ्याचं औचित्य साधून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं महिला सक्षमीकरण...

December 19, 2024 2:59 PM December 19, 2024 2:59 PM

views 9

महाकुंभ मेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच इतर ठिकाणांहून या  विशेष गाड्या सुटतील. या गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून प्रवासी आरक्षण प्रणाली तसंच www.irctc.co.in या रेल्वेच्या संकेतस्थळावरुन आरक्षण करता येईल. या विशेष गाड्यांमध्ये दुसऱ्या वर्गाचे डबे हे अनारक्षित असतील आणि त्यासाठी रेल्वेच्या युटीएस ॲप वरुन तिकीट काढता येईल. याबद्दलची सविस्तर माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मिळेल.

December 2, 2024 1:31 PM December 2, 2024 1:31 PM

views 10

उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाकुंभ मेळा

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून ४३ कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

October 7, 2024 10:41 AM October 7, 2024 10:41 AM

views 7

महाकुंभ मेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अनावरण

उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं.   समुद्र मंथनातून आलेला अमृत कलश, प्रयागराजचा संगम आणि त्याचं धार्मिक तसंच भौगोलिक महत्त्व राज्यातला या बोधचिन्हातून दर्शवण्यात आलं आहे. सर्वसिद्धीप्रदाय कुंभ हे या कुंभमेळ्याचं बोधवाक्य आहे. कुंभ मेळ्याला युनेस्कोकडून मानवतेच्या सांस्कृतिक वारशाचा अमूर्त ठेवा अशी ओळख मिळाली आहे.