February 14, 2025 10:38 AM February 14, 2025 10:38 AM

views 13

कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचे प्रतिक- नवनीत सहगल

महाकुंभ दरम्यान सुरू असलेल्या कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण हे प्रसार भारतीच्या अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचे प्रतिक असल्याचं प्रतिपादन प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी केलं. प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मध्ये स्नान केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सहगल बोलत होते.   कुंभवाणी या वाहिनीचं कौतुक करताना थेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी हे महत्वाचं केंद्र म्हणून उदयाला आल्याचं ते यावेळी म्हणाले. सहगल यांनी नैनी अरेल संगम सेक्टर 4 इथं बांधलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन कें...

January 31, 2025 3:12 PM January 31, 2025 3:12 PM

views 11

प्रयागराज दुर्घटना : न्यायलयीन आयोगाची संगम घाटाला भेट

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला न्यायालयीन आयोग आज संगम घाटाला भेट देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा त्रिसदस्यीय आयोग राज्यसरकारने स्थापन केला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग आणि महासंचालक प्रशांत कुमार यांनी काल संगमस्थळाला भेट दिली.   पुढील अमृतस्नानाच्या दिवशी प्रशासनानं सुरक्षा यंत्रणांचं नियोजन चोख करावं, गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्...

January 29, 2025 10:17 AM January 29, 2025 10:17 AM

views 9

महाकुंभ : मौनी अमावस्येनिमित्त दुसऱ्या अमृतस्नानासाठी भाविकांची गर्दी

उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त आज अमृतस्नानासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर आज संवाद साधला आणि महाकुंभमधील आजच्या नियोजनाचा तसंच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जनहितासाठी काही वेळापुर्वी आखाड्याचं स्नान रद्द करण्यात आलं आहे. गर्दीमुळे काही भाविक महिलांची प्रकृती खालावल्याचं वृत्त आहे. कुंभमेळा परिसरांत आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सात स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात कर...

January 20, 2025 1:51 PM January 20, 2025 1:51 PM

views 11

महाकुंभ मेळ्यामुळे देशभरातल्या कारागीरांना सुवर्णसंधी

प्रयागराज इथल्या महाकुंभमुळे देशभरातल्या कारागीरांना सुवर्णसंधी प्रदान झाली आहे. इथल्या संगमांवर एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेवरील भव्य प्रदर्शन, सहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीने दिली आहे. फिरोजाबादमधील कार्पेट, जरी उत्पादने, काचेची खेळणी, वाराणसीतील लाकडी खेळण्यांचे उत्पादने भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. आकाशवाणीशी बोलताना, प्रयागराज विभागाचे सहआयुक्त उद्योग शरद टंडन यांनी प्रदर्शनात विविध उत्पादने प्रदर्शित करणारे सुमारे 140 स्टॉल उभारण...

January 19, 2025 8:32 PM January 19, 2025 8:32 PM

views 11

महाकुंभ मेळ्यातल्या प्रभाग क्रमांक १९मध्ये भीषण आग

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातल्या प्रभाग क्रमांक १९मध्ये आज दुपारी भीषण आग लागली. प्रशासनानं तातडीनं आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि तपशीलवार माहिती घेतली. आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि मदतकार्य युद्धपातळीवर करायचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.