April 26, 2025 2:51 PM April 26, 2025 2:51 PM

views 10

मध्य प्रदेशच्या बालाघाटमधे चकमकीत चार महिला माओवादी ठार

मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार महिला माओवादी ठार झाल्या. त्यांच्या डोक्यावर ६२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. सध्या या भागात सुरू असलेल्या माओवादविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई झाल्याची माहिती बालाघाटचे पोलीस अधीक्षक नागेंद्र कुमार सिंह यांनी दिली.

January 9, 2025 8:05 PM January 9, 2025 8:05 PM

views 11

सरकारनं भारताला ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं – मंत्री नितीन गडकरी

सरकारनं देशाला ऊर्जा आयात करणाऱ्या देशाऐवजी ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्य प्रदेशातल्या पिठमपूर इथल्या राष्ट्रीय वाहन चाचणी केंद्रानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.    भारत आता पारंपारिक ऊर्जेच्या पर्यायाना सातत्यानं प्रोत्साहन देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, हायड्रोजन हे भविष्यातलं इंधन असून सरकार आणि अनेक वाहन निर्माण कंपन्या त्या दिशेनं प्रयत्न करत असून देशाच्या आर्थिक विकासा...

September 21, 2024 12:22 PM September 21, 2024 12:22 PM

views 48

सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करावं- राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांनी मुलींना उच्च शिक्षण आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती काल संबोधित करताना बोलत होत्या. पालक आणि शिक्षकांचा पाठिंबा आणि मार्गदर्शनानं मुली मोठी स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात, देशाच्या विकासात ही खरी भागीदारी होऊ शकते असंही मुर्मू म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडींच्या आधारे त्यांच्या भविष्यातील कार...

July 15, 2024 2:53 PM July 15, 2024 2:53 PM

views 8

मध्य प्रदेशात प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 मध्य प्रदेशातल्या सर्व ५५ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल इंदूर इथं झालं.   मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते.नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्याबद्दल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातल्या मुलांना लाभदायक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू केल्याबद्दल शाह यांनी मध्य प्रदेश सरकारचं कौतुक केलं.