September 12, 2024 1:07 PM September 12, 2024 1:07 PM

views 23

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ४ दिवसांत जोरदार पाऊसाचा अंदाज

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आगामी चार दिवसांत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. तसंच बिहार, ओडिशा, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथे उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारत, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पुढच्या आठवड्यात होऊ शकेल.

August 13, 2024 1:25 PM August 13, 2024 1:25 PM

views 15

मध्यप्रदेश हे विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारं पहिलं राज्य

विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारं मध्यप्रदेश हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. कर्नाटक, राजस्थान, आणि दिल्ली या राज्यांमध्ये विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स दिली जातात, मात्र मध्यप्रदेशमध्ये स्वच्छता आणि आरोग्य  योजने  अंतर्गत ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. या योजने अंतर्गत आतापर्यंत  सुमारे १९ लाख विद्यार्थिनींना  ५७ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केल्याचं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटलं आहे. 

August 4, 2024 8:05 PM August 4, 2024 8:05 PM

views 11

मध्य प्रदेशात मंदिराची भींत कोसळून ९ लहान मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशात, सागर जिल्ह्यातल्या शहापूर इथं आज सकाळी धार्मिक उत्सवादरम्यान हर्दूल बाबा मंदिराची भींत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ लहान मुलांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. भिंतीखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढलं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या  कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत जाहीर  केली आहे.