December 28, 2025 7:45 PM December 28, 2025 7:45 PM

views 6

मध्य प्रदेशात जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस सहभागी

मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज सहभागी झाले. शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या संस्थेच्या स्थापनेतही अशाच वैश्विक विचाराचं स्वरुप दिसून येतं असं ते म्हणाले.