December 7, 2025 8:10 PM December 7, 2025 8:10 PM

views 13

मध्य प्रदेशात १० नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

मध्य प्रदेशात बालाघाट जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं. त्यात ७७ लाख रुपयांच बक्षीस असलेल्या सुरेंदर उर्फ कबीर या नक्षलवादी नेत्याचा समावेश आहे. नक्षलवादाचं संपूर्ण निरमूलन करुन मध्य प्रदेशाला नक्षलमुक्त करमं हे राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यावेळी सांगितलं. पुनर्वसन धोरणामुळे, वाट चुकलेल्या लोकांना सन्मानाचं आयुष्य जगण्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं ते म्हणाले. 

February 20, 2025 1:19 PM February 20, 2025 1:19 PM

views 22

मध्य प्रदेश मघ्ये वाहन अपघातात ३ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातल्या भिंड इथं आज सकाळी दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले. मृत प्रवासी एका लग्नसोहळ्यासाठी जात होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

February 9, 2025 1:13 PM February 9, 2025 1:13 PM

views 16

मध्यप्रदेशातील अपघातात ३ जणांचा मृत्यू , दहा जण जखमी

मध्यप्रदेशातल्या सतना इथं आज पहाटे झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त मिनी ट्रक भाविकांना प्रयागराज इथं कुंभमेळ्याला घेऊन जात होती.   अपघात झाल्यानंतर सतना - चित्रकुट रस्त्यावर  बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

January 7, 2025 11:02 AM January 7, 2025 11:02 AM

views 12

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झाला 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचा समारोप

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काल 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचा समारोप झाला. चार दिवस झालेल्या या कार्यक्रमात 640 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, आणि 194 प्रकल्प सादर करण्यात आले. हा कार्यक्रम बाल वैज्ञानिकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे, त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नवनिर्मितीला इथं नवी दिशा मिळते. भविष्यातील शास्त्रज्ञ तयार करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा टप्पा आहे, असे मॅपकॉस्टचे महासंचालक डॉ. अनिल कोठारी यांनी सांगितलं.

January 4, 2025 6:01 PM January 4, 2025 6:01 PM

views 10

युनिअन कार्बाइडचा धोकादायक कचरा जाळण्याविरोधात निदर्शनं

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी आश्वासन देऊनसुद्धा युनिअन कार्बाइडचा धोकादायक कचरा जाळण्याविरोधात आज पिथमपूर इथे निदर्शनं करण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी रामकी इन्व्हायरो इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारावर दगडफेकही केली. याच ठिकाणी हा कचरा जाळला जाणार आहे.    अद्याप या ठिकाणी कचरा आणण्यात आलेला नाही किंवा जाळण्याची कोणतीही पूर्वतयारी करण्यात आलेली नाही, असं उप तहसीलदार अनिता बरेठा यांनी स्पष्ट केलं.

December 16, 2024 1:22 PM December 16, 2024 1:22 PM

views 18

मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं.  सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर चर्चा होणार असून  महानगरपालिका कायदा तसंच खाजगी विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे.  तसंच २०२४-२५ या वर्षासाठीचा १५ हजार कोटी रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्पही या पाच दिवसांच्या अधिवेशनात मांडला जाईल. 

November 3, 2024 11:45 AM November 3, 2024 11:45 AM

views 9

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झालेल्या हत्तींच्या मृत्यूची चौकशी सुरू

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झालेल्या हत्तींच्या मृत्यूची चौकशी सरकारनं  सुरू केली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या - वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाने, व्याघ्र प्रकल्पातल्या राखीव भागात झालेल्या दहा हत्तींच्या मृत्यूच्या चौकशीकरता एक पथक तयार केलं  आहे. हे पथक या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत असून मध्य प्रदेश सरकारनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच जणांची राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे.

October 7, 2024 1:39 PM October 7, 2024 1:39 PM

views 13

भोपाळ इथून अठराशे कोटीं रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त पथकानं मध्य प्रदेशात भोपाळ इथून अठराशे कोटीं रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.   या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. भोपाळजवळच्या बागरोडा गावातल्या एका कारखान्यातून हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे

September 29, 2024 3:01 PM September 29, 2024 3:01 PM

views 10

मध्यप्रदेशातल्या मेहर इथं रस्ता अपघातात ९ ठार, २४ जखमी

मध्यप्रदेशात मेहर जिल्ह्यातही काल रात्री वेगाने चाललेली बस अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला असलेल्या दुसऱ्या वाहनावर आदळली. अपघातात बसमधले नऊ प्रवासी ठार झाले तर चोवीसजण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतल्या जखमीं प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

September 12, 2024 8:16 PM September 12, 2024 8:16 PM

views 7

मध्य प्रदेशात भिंत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातल्या दतिया जिल्ह्यात आज सतत होणाऱ्या पावसामुळं भिंत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात आलं आहे. खालकापुरा परिसरात राजगड किल्ल्याची ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्यानं ही दुर्घटना झाली. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृताच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रूपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.