December 17, 2024 5:38 PM

views 13

पत्र लिहिणं ही एक कला असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही कला जोपासायला हवी-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

पत्र लिहिणं ही एक कला असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही कला जोपासायला हवी, यातूनच पुढे उत्तम साहित्यिक घडतील, असं मत ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आज मांडलं. मुंबईच्या जनरल पोस्ट कार्यालयानं आयोजित केलेल्या ‘पत्रोत्सव २०२४’ या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय डाक विभागाच्या 'ढाई आखर' या पत्रलेखन स्पर्धेअंतर्गत शालेय मुलांसाठी मुंबई जनरल पोस्ट कार्यालयानं पत्रं लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवल्या. मुंबईत राहणाऱ्...