March 30, 2025 1:58 PM March 30, 2025 1:58 PM

views 11

नागपुरात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन झालं. नागपुरात माधव नेत्रालय गोळवलकर गुरूजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून नागपुरात आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत, असं यावेळी ते म्हणाले. देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे, आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.    वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे, मेडिकलच्या जागा...