January 8, 2026 3:03 PM
130
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं निधन
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं काल रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. भारताच्या पर्यावरण विषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. आपल्या सहा दशकांपेक्षा जास्त वैज्ञानिक कारकिर्दीत, पर्यावरणाबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. माधव गाडगीळ यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी, आणि १९६९ साली...