August 1, 2025 1:13 PM August 1, 2025 1:13 PM

views 14

Macau Open Badminton 2025 : भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

मकाऊ खुल्या बँडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरूष एकेरीत तरुण मन्नेपल्ली आणि लक्ष्य सेन यांनी आपापले सामने जिंकून अंतिम आठामध्ये प्रवेश निश्चित केला. या दोघांचे सामने आज चीनच्या खेळाडूंबरोबर होणार आहेत. पुरूष दुहेरीत, सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जपानच्या जोडीचा 10-21, 22-20, 21-16 असा पराभव केला. आज उपांत्यपूर्व फेरीत त्यांची गाठ मलेशियन जोडीशी पडणार आहे. आयुष शेट्टीचा पराभव झाल्याने तो स्पर्धेबाहेर पडला.