September 28, 2024 8:09 PM September 28, 2024 8:09 PM

views 12

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत आज भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना उपांत्य फेरीत पराभव झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्रिसा आणि गायत्री या जोडीला चिनी तैपेईच्या हुंग-एन-त्झु आणि सिएह पेई शान जोडीकडून 21-17, 16-21, 21-10. असा पराभव स्विकारावा लागला. याआधी भारताच्या किदम्बी श्रीकांतलाही  पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागल्याने भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

September 27, 2024 3:20 PM September 27, 2024 3:20 PM

views 9

मकाऊ ओपन बॅडमिंटन : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीची उपांत्य फेरीत धडक

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या जोडीनं सु यिन हुई आणि वु लुओ या तैवानी जोडीचा २१-१२, २१-१७ असा सरळ गेममधे पराभव केला. या दोघीही उद्या उपांत्य सामन्यात सिह पेई शान आणि हंग एन झु या दुसऱ्या एका तैवानी जोडीशी लढत देतील.

September 26, 2024 8:47 PM September 26, 2024 8:47 PM

views 13

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांतकडून भारताच्याच आयुष शेट्टीचा पराभव

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतनं भारताच्याच आयुष शेट्टीचा २१-१३, २१-१८ असा पराभव केला. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीनं तैवानच्या लिन चिह-चुन आणि तेंग चुन-सुन यांचा २२-२०, २१-११ असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या तस्निम मीरला जपानच्या तोमोका मियाकाझीविरुद्ध १७-२१, २१-१३, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.