August 12, 2024 3:50 PM August 12, 2024 3:50 PM
13
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २५ तारखेला ‘मन की बात’ मधून देशवासियांशी साधणार संवाद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ११३ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ तारखेपर्यंत १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.