March 9, 2025 3:40 PM March 9, 2025 3:40 PM
3
लुधियानात कारखान्याचं छत कोसळून एकाचा मृत्यू, पाच जखमी
पंजाबमधल्या लुधियाना इथल्या निर्माणाधिन कारखान्याचं छत कोसळून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. छताच्या मलब्याखाली सात कामगार अडकले होते. यातल्या एका कामगाराचा मृत्यू झाला, पाच जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र एक जण अजूनही सापडला नाही, असं पोलिसांनी आकाशवाणीला बोलताना सांगितलं. एनडीआरएफ आणि पोलिसांची पथकं कामगाराचा शोध घेत आहेत.