April 15, 2025 9:02 AM

views 16

आयपीएल – चेन्नई सुपर किंग्ज संघाचा लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि आपली पाच सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित केली. प्रथम फलंदाजी करताना, लखनऊ संघानं निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबेच्या धमाकेदार खेळीमुळे चेन्नईनं १९ षटक आणि तीन चेंडूत १६७ धावांचं लक्ष्य गाठलं आणि सामना जिंकला. महेंद्रसिंग धोनीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

April 5, 2025 8:44 AM

views 28

आयपीएल – लखनऊ सुपर जायंटस् संघाचा मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनऊ सुपर जायंटस् संघानं मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या संघानं 20 षटकांत 8 गडी बाद 203 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या संघाला 5 गडी बाद 191 धावा करता आल्या.

April 1, 2025 2:09 PM

views 12

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्ज बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जबरोबर लखनौ इथं होणार आहे. काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्स संघानं १७ षटकात ११६ धावा केल्या. विजयासाठीचं ११७ धावांच हे लक्ष्य मुंबईने दोन गड्याच्या मोबदल्यात केवळ १३व्या षटकातच पूर्ण केलं.