March 10, 2025 5:14 PM March 10, 2025 5:14 PM

views 4

विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. निवडणुकांसाठी १७ मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येतील, १८ मार्चला अर्जांची छाननी होईल आणि २० मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता वाटल्यास २७ मार्च रोजी मतदान होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होते आहे. विधानसभा आमदारांच्या मधून ही निवडणूक होणार आहे.