July 1, 2025 12:33 PM July 1, 2025 12:33 PM
14
व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट
व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मुंबईत ५८ रुपयांनी किंमत कमी झाली असून आता ती १ हजार ६६५ रुपये झाली आहे. दरम्यान, नवी दिल्लीत व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत ५८ रुपये ५० पैशांनी, कोलकातामध्ये ५७ रुपये आणि चेन्नईमध्ये ५७ रुपये ५० पैशांनी घट झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली आहे.a