January 2, 2026 3:07 PM January 2, 2026 3:07 PM

views 1

व्यावसायिक वापरासाठीच्या एल पीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये १११ रुपयांची वाढ

घरगुती ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या गॅसच्या दारात कोणतेही बदल झाले नसल्याचं तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या एल पीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये एकशे अकरा रुपयांची  वाढ झाली आहे, त्यामुळे घरगुती ग्राहकांनाही वाढीव किंमत द्यावी लागणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.