November 17, 2025 3:06 PM

views 24

तेल कंपन्यांचा अमेरिकेबरोबर पहिल्यांदाच करार

सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनी अमेरिकेबरोबरच पहिल्यांदाच LPG आयातीसाठी करार केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार एक वर्षासाठी लागू असेल. नागरिकांना किफायतशीर दरात LPG उपलब्ध करून देण्यासाठी आणि पुरवठा व्यवस्थेत विविधता आणण्यासाठी सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.