November 8, 2025 12:16 PM November 8, 2025 12:16 PM

views 28

2028 लॉस एंजेलिस स्पर्धेत टी-20 स्वरूपात पुरुष व महिला सामने

लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिंपिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटचे सामने सहा संघांसोबत खेळले जाणार असून यामध्ये एकत्रित 28सामने होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे.   वर्ष 1900 मध्ये पॅरिसमध्ये पदार्पण केल्यानंतर ग्रेट ब्रिटनने फ्रान्सविरुद्धच्या एकाच सामन्यात सुवर्णपदक जिंकले होते. आता 128 वर्षांनी हा खेळ पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये खेळला जाईल.

April 10, 2025 1:06 PM April 10, 2025 1:06 PM

views 16

अमेरिकेतील २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार

अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने काल याची घोषणा केली.   ऑलिंपिकमध्ये २० षटकांचे सामने होणार असून त्यात पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी सहा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी १५ खेळाडू खेळवू शकणार आहे. मात्र, अद्याप यासाठी स्टेडियमच्या नावांची यादी ठरवण्यात आलेली नाही.

January 12, 2025 2:48 PM January 12, 2025 2:48 PM

views 8

अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात

अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये लागलेल्या ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात आले आहेत. ईटन, हर्स्ट, केनेथ आणि पॅलिसेड या भागातल्या सुमारे ३८ हजार एकरमध्ये ही आग पसरली आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण बेपत्ता आहेत.   १२ हजारांहून अधिक घरं आणि इमारती नष्ट झाल्या आहेत. ही आग पूर्वेकडे सरकत असल्यानं ब्रेंटवुड आणि एन्सिनोला ही स्थलांतराचे आदेश दिले आहेत. या भागात बुधवारपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्यानं आग आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली ज...

January 10, 2025 11:05 AM January 10, 2025 11:05 AM

views 16

अमेरिकेतल्या ल़ॉस एंजलीस शहरात वणव्यामुळे ५ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील लॉस एंजलीस शहरासह आजूबाजूच्या प्रदेशांत वेगाने वणवा पसरत असून, हॉलीवूड सह अनेक प्रदेशात धोका निर्माण झाला आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही. लॉस एंजलीस काऊंटी मधील सुमारे 1 लाख 80 हजार रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वणव्यामुळे लागलेल्या आगीत हॉलीवूड मधील अनेक चित्रपट कलाकार आणि मान्यवरांना घरे गमवावी लागली आहेत. या वणव्यात आतापर्यंत अंदाजे 17 हजार एकरपेक्षा अधिक जमिनीला आगीची झळ बसली असून,...