January 21, 2026 1:49 PM

views 12

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांचा घेराव

विविध मागण्यांसाठी निघालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च काल महाराष्ट्रातल्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांनी आज घेराव घातला असून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असून प्रशासन चर्चेसाठी तयार असल्याचं आमदार विनोद निकोले यांनी सांगितलं.