March 21, 2025 1:35 PM
18
लंडनमध्ये भीषण आग, हीथ्रो विमानतळ बंद
लंडनमध्ये एका विद्युत उपकेंद्राला आग लागली असून त्यातून दीडशे जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पश्चिम लंडन भागातल्या या उपकेंद्राला काल रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि ७० कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग लागण्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, त्यामुळे लंडनच्या पश्चिम भागातल्या सुमारे १६ हजार ३०० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. लंडनच्या हीथ्रो विमानतळाचा वीजपुरवठाही खंडित झाला असून आज दिवसभरात विमानतळ बंद राहील अशी माहिती विमानतळाने अधिकृत निवेदनाद्वारे दिल...