July 1, 2024 1:29 PM

views 15

वर्षा सहली दरम्यान एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळा इथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जण काल भुशी धरणात वाहून गेले. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी होते. यात एक महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.