October 15, 2024 7:39 PM

views 9

नांदेड आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीचा मार्ग मोकळा

वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात तसंच राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडमधल्या केदारनाथ विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळापत्रकानुसार निवडणूक होईल. इतर ठिकाणी १३ नोव्हेंबरला मतदान होईल.

August 9, 2024 8:20 PM

views 18

वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत मंजूर झाला. या समितीत लोकसभेतले २१ तर राज्यसभेतले १० खासदार आहेत. लोकसभेतले जदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्य, दिलीप साईकिया, गौरव गोगोई, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, अरविंद सावंत, इम्रान मसूद, मोहम्मद जावेद, असदउद्दीन ओवैसी, कल्याण बॅनर्जी या सदस्यांचा समावेश आहे. ही समिती संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी अहवाल सादर करील असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू य...

August 9, 2024 8:07 PM

views 22

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज निर्धारित वेळेआधी दोन दिवस संस्थगित करण्यात आलं. गेल्या महिन्यात २२ तारखेला सुरु झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत चालणार होतं. लोकसभेत या अधिवेशन काळात १५ बैठका झाल्या, ११५ तास कामकाज झालं, अशी माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर २७ तास १९ मिनिटं चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशन काळात लोकसभेत नवीन १२ विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी वित्त विधेयक, विनियोजन ...

August 8, 2024 6:45 PM

views 6

लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ सादर

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आज लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ सादर केलं. हे विधेयक केंद्र सरकारला कोणत्याही विमानासाठी किंवा विमानांच्या श्रेणीसाठी, विमानाच्या ऑपरेशनच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही हवाई अपघाताच्या किंवा घटनेच्या तपासासाठी नियम बनविण्याचे अधिकार देते. विमान कायदा १९३४ मध्ये आणला गेला आणि त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) यांसारख्या संस्थांच...

August 6, 2024 8:01 PM

views 21

काळा पैसा विरोधी आणि कर चुकवेगिरी कायद्यांतर्गत १७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेसंबंधात ६५२ प्रकरणं उघडकीस

मागच्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत काळा पैसा विरोधी आणि कर चुकवेगिरी कायद्यांतर्गत १७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेसंबंधात ६५२ प्रकरणं उघडकीला आली असून यापैकी १६३ प्रकरणात खटले दाखल केले आहेत, अशी माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी  लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.  पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ११ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना आतपर्यंत ३ लाख २४ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीचं  वाटप केलं आहे अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आज ल...

August 6, 2024 2:58 PM

views 16

देशात गेल्या १० वर्षात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ओसरला – गृह राज्यमंत्री नित्यानंद राय

देशात गेल्या १० वर्षात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ओसरल्याचं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. २००४ ते १४ या कालावधीच्या तुलनेत २०१४ ते २४ या काळात नक्षलवादी घटनांचं प्रमाण ५३ टक्क्यांनी कमी झालं आहे, असं ते म्हणाले. देशात नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या कमी होऊन ३८ वर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या १० वर्षात नक्षलवादी घटनांमध्ये मृत पावलेले सुरक्षा दलाचे जवान तसंच नागरिकाचं प्रमाण देखील कमी झालं आहे, असं ते म्हणाले.

August 5, 2024 8:02 PM

views 15

अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांनी प्रस्तावित केलेल्या अनुदानाच्या थकबाकी मागण्या लोकसभेत मान्य

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांनी प्रस्तावित केलेल्या खर्चाशी संबंधित अनुदानाच्या थकबाकी मागण्या लोकसभेनं आज चर्चेविना मंजूर केल्या. तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या विनियोजन विधेयक २०२४ लाही सभागृहानं मंजुरी दिली. या विधेयकाच्या माध्यमातून २०२४-२५ या आर्थिक वर्षातल्या सेवांसाठी एकत्रित निधीतून देयकं आणि खर्चांना मंजुरी दिली जाणार आहे.

August 5, 2024 3:28 PM

views 11

ग्रामीण भागात पतपुरवठ्यामधे वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन

ग्रामीण भागात पतपुरवठ्यामधे वाढ झाली असून २०१४ मधे ७ लाख ३० हजार कोटी पतपुरवठा झाला होता त्या तुलनेत २०२४ मधे २५ लाख ४६ हजार कोटी रुपये पतपुरवठा झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत दिली. एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून २०१४ मधे शेतकऱ्यांना सव्वाचार लाख कोटीपेक्षा जास्त पीक कर्जं देण्यात आली तर २०२४ पर्यंत ही रक्कम ९ लाख ८२ हजार लाख कोटींपर्यंत पोहोचली. कृषी उत्पादन वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी...

August 5, 2024 1:03 PM

views 12

लोकांना जलद आणि वेळेत न्याय मिळवून देण्याच्या दिशेनं देशातली न्याय यंत्रणा लवकरच मोठा टप्पा पार करेल – अमित शहा

लोकांना जलद आणि वेळेत न्याय मिळवून देण्याच्या दिशेनं देशातली न्याय यंत्रणा लवकरच मोठा टप्पा पार करेल असा विश्वास केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल चंदीगड इथं न्याय सेतू, न्याय श्रुती, इ-पुरावा आणि इ-समन यंत्रणांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. नवीन गुन्हेगारी कायदे आपल्या राज्यघटनेशी सुसंगत असून लोकांना शिक्षा सुनावण्यापेक्षा न्याय देण्यावर भर देणारे आहेत असं अमित शहा म्हणाले.    

July 31, 2024 7:34 PM

views 14

लोकसभेत आज भारतीय वायुयान विधेयक सादर

केंद्र सरकारनं आज लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक सादर केलं. नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरपु राममोहन नायडू यांनी हे विधेयक मांडलं. १९३४ च्या विमान कायद्यात नंतर अनेक दुरुस्त्या झाल्या, त्या तुकड्या-तुकड्यानं या विधेयकात समाविष्ट केल्यानं त्यात सुसूत्रता राहिली नाही, म्हणून त्यातला गोंधळ दूर करण्यासाठी भारतीय वायुयान विधेयक आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं.   कोणत्याही विमानाचं किंवा विमानश्रेणीचं डिझाईन, निर्मिती, देखभाल, ताबा, वापर, परिचालन, विक्री, आयात किंवा निर्यात यांच्या नियंत्रणासाठी न...