December 17, 2024 9:03 PM
81
एक देश एक निवडणूक संदर्भातली घटनादुरुस्ती विधेयकं लोकसभेत सादर
एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं आज लोकसभेत मांडण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडत असताना विरोधकांनी विधेयक मांडण्यावर मतदानाची मागणी केली. त्यावर २६९ सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिला. तर १९८ सदस्यांनी विधेयक मांडण्याला विरोध केला. त्यात काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सीपीआय एम आणि इतर विरोधी खासदारांचा समावेश होता. ही विधेयकं म्हणजे संविधानाच्या मूलभूत ढाच्यावर हल्ला असल्याचं सांगत त्यांचा मसुदा आधी संयुक्...