March 10, 2025 5:53 PM

views 11

लोकसभेत ५१ हजार ४६३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरु झालं. लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी ५१ हजार ४६२ कोटी ८६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या रकमेतले  निवृत्तीवेतनासाठी १३ हजार ४४९ कोटी रुपये आणि खतांवरच्या अनुदानासाठी १२ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अतिरिक्त खर्चासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.    केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेत २०२५-...

February 13, 2025 4:00 PM

views 24

लोकसभेत प्राप्तिकर विधेयक सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्राप्तिकर विधेयक २०२५ सादर केलं. स्थायी समितीकडे हे विधेयक पाठवायचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्राप्तिकराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडलं आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवं प्राप्तिकर विधेयक आणण्याची घोषणा केली होती. दरम्यान, लोकसभेचं पहिल्या टप्प्याचं कामकाज पूर्ण झाल्यामुळे येत्या १० मार्च पर्यंत सदनाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.    वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ बाबतच्या संयुक...

February 13, 2025 12:55 PM

views 23

लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ बाबतच्या संयुक्त समितीच्या अहवालावर विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. हा अहवाल आज सभागृहात मांडला जाणार आहे. सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस, डीएमके आणि समाजवादी पार्टीसह विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्ष सदस्यांना सूचिबद्ध कामकाज सुरु करण्याचं आवाहन केलं. मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे सभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं.  ...

February 11, 2025 8:04 PM

views 20

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सर्वाधिक ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक राहील, यासाठी केंद्र सरकार सर्व उपाययोजना करेल, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सरकारकडून घेतलं जाणारं ९९ टक्के कर्ज हे भांडवल निर्मितीसाठी खर्च होत आहे. चलनवाढीचा दर २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यावर सरकारचा भर आहे, असं त्या म्हणाल्या. रुपयाच्या घसरणीला जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेतले अनेक घटक कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं. दक्षिण कोरिया, इ...

February 10, 2025 7:35 PM

views 21

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला कोणत्याही राज्याचा विरोध नसल्याची जलशक्तीमंत्र्यांची लोकसभेत माहीती

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यानं विरोध केलेला नाही, असं केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांनी लोकसभेत सांगितलं. खासदार विशाल पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपरस्थित केला होता, त्यावर जलशक्ती मंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला, त्याला कृष्णा पाणी लवादानं मंजुरी दिली. या प्रश्नावर कोणत्याही राज्याकडून धरणाची उंची वाढवायला विरोध असल्याचा प्रस्ताव दाखल झालेला नाही, असा खुलासा लेखी उत्तरात केला आहे.  &nbsp...

February 3, 2025 5:48 PM

views 22

देशात बेरोजगारीचा प्रश्न अद्यापही कायम असून सरकारला तो सोडवण्यात अपयश-राहुल गांधी

देशात बेरोजगारीचा प्रश्न अद्यापही कायम असून सरकारला तो सोडवण्यात अपयश आल्याचं टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. संसदेच्या संयुक्त सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेत ते बोलत होते. सकल राष्ट्रीय उत्पादन १५ पूर्णांक ३ शतांश टक्क्यांवरून १२ पूर्णांक ६ शतांश टक्क्यांपर्यंत घसरलं असून हे गेल्या साठ वर्षांतलं सर्वात कमी उत्पादन आहे, असंही गांधी यावेळी म्हणाले. मेक इन इंडिया ही चांगली कल्पना असूनही तिची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरल...

February 3, 2025 5:40 PM

views 14

डिजिटल पेमेन्टच्या वाढीमागे UPI पद्धतीचं यश -पंकज चौधरी

गेल्या आर्थिक वर्षात देशभरातल्या डिजिटल पेमेंट व्यवहारात ४४ टक्के वाढ होऊन ते  १८ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. तात्काळ पेमेंट सेवा आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक पथकर जमा योजनेनं लक्षणीय प्रगती केली असून देशभरातल्या डिजिटल पेमेन्टच्या वाढीमागे यु पी आय पद्धतीचं यश कारणीभूत असल्याचं  ते म्हणाले.    पाच वर्षांपूर्वी ६ टक्के असणारा देशातला बेरोजगारीचा अंदाजे दर कमी होऊन गेल्या आर्थिक वर्षात तीन...

December 19, 2024 6:54 PM

views 12

हरीत महामार्ग धोरण २०१५ अनुसार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु-नितीन गडकरी

हरीत महामार्ग धोरण २०१५ अनुसार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु झाल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांवर बासष्ठ हजार किलोमीटरपेक्षाही अधिक पट्ट्यावर रोपं लावण्याचं काम सुरु झालं आहे. या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.  यामुळे स्त्रिया, स्वयंसेवी संस्था अशा परिघावरच्या  ग्रामीण समुदायाला लाभ होईल आणि सामाजिक आर्थिक उन्नतीच्या दिशेने त्यांची व...

December 19, 2024 3:07 PM

views 19

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे गदारोळ झाला. घोषणाबाजीमुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, आणि इतर पक्षांचे सदस्य अमित शाह यांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. काही सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत शिरले. घोषणा चालूच राहिल्याने सभापती ओम बिरला यांनी आधी दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतरही गदारोळ चाल...

December 18, 2024 3:32 PM

views 18

दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरुन गदारोळ झाल्याने आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी आज प्रचंड गदारोळ केला. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर लगेचच काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी शहा यांचा निषेध करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली.    ...