March 27, 2025 8:25 PM

views 30

देशात लवकरच सहकारी तत्त्वावर ‘टॅक्सी सेवा’

उबर आणि ओला या टॅक्सीसेवांच्या धर्तीवर केंद्र सरकार सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. लोकसभेत आज चर्चेदरम्यान शहा यांनी ही घोषणा केली आहे. तसंच, सरकार लवकरच एका विमा कंपनीची स्थापना करणार असून ही कंपनी देशातल्या सहकारी व्यवस्थेतले विम्याचे व्यवहार हाताळेल, असंही शहा म्हणाले. 

March 27, 2025 6:57 PM

views 16

LokSabha : स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक मंजूर

व्यवसाय, शिक्षण, संशोधन, पर्यटन आणि आरोग्यासाठी देशात येणाऱ्यांचं स्वागत आहे. मात्र देशाला धोका निर्माण करू इच्छिणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. लोकसभेत स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयकावरील चर्चेला ते उत्तर देत होते. हे विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल, अर्थव्यवस्था आणि व्यवसायाला चालना मिळेल याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल असं ते म्हणाले. यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येक व...

March 25, 2025 3:42 PM

views 30

लोकसभेत गदारोळामुळे कामकाज तहकूब

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित निधी न मिळाल्याबद्दल आज लोकसभेत गदारोळ झाल्यामुळे लोकसभेच कामकाज तहकूब कराव लागलं. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांसाठी प्रलंबित निधीवरून गोंधळ घातला.   पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना, ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी पश्चिम बंगालमध्ये मनरेगा निधीचा गैरवापर आणि योजनेच्या अंमलबजावणीत अनियमिता असल्याचं सांगितल...

March 23, 2025 8:59 AM

views 16

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे – खा. सुप्रिया सुळे

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर कमी लोकसंख्येच्या राज्यांना, अधिक लोकसंख्येच्या राज्यांच्या तुलनेत कमी प्रतिनिधीत्व मिळेल, अशी शक्यता सुळे यांनी वर्तवली.

March 20, 2025 7:59 PM

views 27

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभेत आज सरकारविरोधी घोषणा छापलेले कपडे घालून विरोधी पक्ष सदस्य सभागृहात आले होते. सभापती ओम बिरला यांनी त्याला हरकत घेतली.   लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनरर्चनेला विरोध दर्शवणाऱ्या घोषणा छापलेले कपडे परिधान करुन द्रमुकचे सदस्य सभागृहात आले होते.   त्यांनी सभागृहाबाहेर जावं असं सभापतींनी सांगितलं, पण तसं न करता विरोधी पक्ष सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज २ वाजेपर्यंत, आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.   राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आ...

March 20, 2025 3:21 PM

views 21

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभेत आज सरकारविरोधी घोषणा छापलेले कपडे घालून विरोधी पक्ष सदस्य सभागृहात आले होते. सभापती ओम बिरला यांनी त्याला हरकत घेतली. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनरर्चनेला विरोध दर्शवणाऱ्या घोषणा छापलेले कपडे परिधान करुन द्रमुकचे सदस्य सभागृहात आले होते. त्यांनी सभागृहाबाहेर जावं असं सभापतींनी सांगितलं, पण तसं न करता विरोधी पक्ष सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज २ वाजेपर्यंत, आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.   राज्यसभेत  अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आधी एकदा १२ वा...

March 18, 2025 3:00 PM

views 19

मतदार संघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करू न दिल्याच्या निषेधार्थ द्रमुकच्या सदस्यांचा सभात्याग

मतदार संघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करू न दिल्याच्या निषेधार्थ द्रमुकच्या सदस्यांनी आज सभात्याग केला. लोकसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाली तेव्हा प्रश्नोत्तराच्या तासात द्रमुक सदस्यांनी मतदार संघांच्या सीमांकनाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्द्यावर बोलण्याची परवानगी दिली जाईल, असं सांगितलं.   परंतु, द्रमुक सदस्य त्यांच्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहात आम्हाला मतदार संघांच्...

March 18, 2025 2:44 PM

views 25

केंद्र सरकार शेतकऱ्यांशी दुजाभाव करत नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण

कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार दुजाभाव करत नाही, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. देशातील शेतकऱ्यांच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारानं कायमच प्राधान्य दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं.    काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी वायनाडशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान यांनी सांगितलं की, देशाच्या कोणत्याही राज्यावर मग ते केरळ असो वा कर्नाटक तिथं जर ...

March 17, 2025 1:18 PM

views 27

‘कंपनी कायदा आणि दिवाळखोरी संहितेअंतर्गत २० हजारांहून अधिक प्रकरणं न्यायालयांमध्ये प्रलंबित’

कंपनी कायदा आणि दिवाळखोरी संहिते अंतर्गत आतापर्यंत २० हजारांहून अधिक प्रकरणं न्यायालयांमध्ये प्रलंबित असल्याचं सरकारनं लोकसभेत सांगितलं.  कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज लोकसभेत उपस्थित केलेल्या पूरक प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.  प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात आल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. यात ई-कोर्ट, हायब्रिड कोर्ट योजना, सदस्यांची क्षमता वाढवणं आणि रिक्त पदे भरणं या उपायांचा यात समावेश असल्याचंही मल्होत्रा यांनी सांगितलं. 

March 11, 2025 3:57 PM

views 19

लोकसभेत मणिपूरच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

लोकसभेत चालू आर्थिक वर्षातल्या पुरवणी मागण्या आणि मणिपूरच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. ५१ हजार ४६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारनं मांडल्या आहेत. या चर्चेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी भारत आणि अमेरिके दरम्यान कथित टॅरिफ युद्ध, असंघटित कामगार आणि मेक इन इंडिया यासारख्या विषयांवर सरकारला प्रश्न विचारले.   राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांनी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य वृद्धीवर मत व्यक्त केलं. विद्यापीठांमध्ये...