August 12, 2025 3:23 PM

views 37

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरुन हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत सादर झाला. सभापती ओम बिरला यांनी सांगितलं की, महाभियोग चालवण्याचे १४६ सदस्यांचे प्रस्ताव सभागृहाला मिळाले आहेत.   न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांचं गंभीर स्वरुप लक्षात घेऊन त्या प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यांच्या समितीची घोषणा सभापतींनी केली. त्यात सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महिंद्र मोहन श्रीवास्तव आणि ज्येष्ठ विधिज्ञ बी. व्ही. ...

August 12, 2025 1:29 PM

views 24

लोकसभेतलं कामकाज…

लोकसभेच्या सभागृहाचं कामकाज आज सुरु झाल्यावर विरोधकांनी बिहार मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती. प्रश्नोत्तरांच्या तासात विरोधकांच्या घोषणा सुरु झाल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सभागृह तहकूब केलं.    गोंधळ सुरु असतानाच ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेमसेनी यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ अंतर्गत सुरु असलेल्या घरांच्या बांधकामाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिलं.  केंद्र सरकारने या योजने...

August 11, 2025 3:14 PM

views 24

लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक मांडलं. याआधीच्या प्राप्तिकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं ते गेल्या आठवड्यात मागे घेतलं होतं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज सकाळी विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून गदारोळ केल्यामुळे आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.   सकाळी अकरा वाजता राज्यसभेचं कामकाज  सुरु होताच उपाध्यक्ष हरिवंश यांनी शून्य प्रहर पुकारण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांनी बिहार मतदारयाद्या पुनरिक्षण य...

August 4, 2025 1:26 PM

views 8

LokSabha : रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ११ लाख जणांना रोजगार मिळाला असल्याचं सरकारचं निवेदन

रोजगार मेळ्यात मागच्या १६ महिन्यांच्या कालावधीत ११ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत, एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार गेल्या दशकात १७ कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराच्या केवळ ३ कोटी संधी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत  येत्या ५ वर्षात ४ ...

August 1, 2025 1:14 PM

views 9

लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. ११ वाजता कामकाज सुरु झाल्यावर सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, त्याचवेळी विरोधी पक्षांनी बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करावं या मागणीसाठी घोषणा द्यायला सुरुवात केली. प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज आणि इतर महत्त्वाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन सभापतींनी केलं मात्र त्याचा उपयोग झाला नाही. सभापतींनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं.

July 25, 2025 12:49 PM

views 19

विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरूच राहिला. लोकसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीमुळं सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर २६व्या करगिल विजय दिवसानिमित्त सर्व सभासदांनी या युद्धात वीरश्री गाजवलेल्या जवानांना अभिवादन केलं आणि यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ मौन पाळलं. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला.   इतक्यात विरोधी पक्ष...

July 22, 2025 1:17 PM

views 17

दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.   लोकसभेत सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरु केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे महत्त्वाचे प्रश्न पटलावर असल्यानं शांतपणे कामकाज चालू द्यावं, असं सभापती बिरला यांनी सदस्यांना सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसि...

April 4, 2025 1:26 PM

views 15

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. ३१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात ११८ टक्के काम झालं असून १६ विधेयकं पारित  झाल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत १४ तास तर  राज्यसभेत १७ तास चर्चा झाल्याचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं.  हे विधेयक सरकारने बळजबरीने पारीत करून घेतल्याचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी  यांचा आरोप रिजिजू यांनी फेटाळून लावला. ...

April 3, 2025 9:37 AM

views 16

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यतेबाबत लोकसभेत ठराव मंजूर

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मणिपूरमध्ये स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. या राज्यात शांतता प्रस्थापित होण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले आणि गेल्या चार महिन्यांमध्ये संघर्षामुळे कोणताही मृत्यू झाला नसल्याचं सांगितलं.

March 28, 2025 10:36 AM

views 19

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक 2025 लोकसभेत मंजूर

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक, 2025 काल लोकसभेत संमत करण्यात आलं. स्थलांतरविषयक कायद्यांचं आधुनिकीकरण करणं आणि पारपत्रं, प्रवासविषयक दस्तऐवज, व्हिसा आणि नोंदणी यासंदर्भात केंद्र सरकारला काही विशिष्ट अधिकार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना देताना गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीनं हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.   भारत हा भू-राजकीय नव्हे तर भू-सांस्कृतिक देश आहे. स्थलांतरितांचं स्वागत करून...