June 21, 2024 10:20 AM

views 27

लोकसभा निवडणूक : ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे ८ अर्ज दाखल

२०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे आठ अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या अर्जाचाही यात समावेश आहे. तसंच तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड मधील उमेदवारांनीही या अंतर्गत अर्ज केले आहेत.   आंध्र प्रदेश आणि ओडिशामधील राज्य विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात देखील याच संदर्भात तीन अर्ज प्राप्...

June 19, 2024 3:50 PM

views 17

नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाने विजय मिळवला – विनायक राऊत

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत विजय मिळवला आहे, असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोटीशीद्वारे केली आहे. राणे यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवायला आणि मतदान करायला बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

June 17, 2024 8:34 PM

views 22

वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. ते आता रायबरेलीचं प्रतिनिधित्व करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ही घोषणा केली.    राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वायनाडच्या जागेवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, असं खरगे यांनी जाहीर केलं.

June 17, 2024 6:30 PM

views 49

वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला आव्हान देणार – आदित्य ठाकरे

वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला येत्या एक-दोन दिवसांत न्यायालयात आव्हान देणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलं आहे. अमोल किर्तीकर यांचा पराभव सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाल्याचा आरोप करत मुंबईतल्या पत्रकार परिषदेत अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली.     या मतदार संघातील मतमोजणी सुरू असताना १८  व्या फेरीपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक फेरीमधील मतमोजणीची आकडेवारी जाहीर करत होते. परंतु १९ व्या फेरीनंतर ते बंद केल्याचा दावा...

June 17, 2024 3:26 PM

views 35

‘वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वापरलेल्या मोबाईलचा मतमोजणीशी संबंध नाही’

ईव्हीएम, अर्थात ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज लागत नाही, ते कशाशीही जोडलेलं नसतं, असं वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघातल्या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी लागणारा मोबाईल शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातलगाकडे असल्याची चर्चा सुरू होती, त्या पार्श्वभूमीवर त्या आज वार्ताहर परिषदेत बोलत होत्या.   जो मोबाईल वापरला गेला तो इनकोर सिस्टीमशी निगडीत होता. त्याचा मतमोजणीशी संबंध नसून डे...

June 16, 2024 12:51 PM

views 23

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी भाजपची समिती स्थापन

देशाची लोकसभा निवडणुक पार पडल्यानंरत पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी भाजपनं एक समिती स्थापन केली आहे. खासदार बिप्लब कुमार देब, रविशंकर प्रसाद, ब्रिजलाल आणि कविता पाटीदार या भाजपा नेत्यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या राजकीय हिंसाचारांच्या घटनांविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना अहवाल सादर करणार आहेत.