December 18, 2025 1:33 PM

views 19

‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत ‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ सादर केलं. भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं, हे या विधेयकाचं  उद्दिष्ट आहे. हे विधेयक पुढल्या छाननीसाठी आर्थिक विषयावरच्या संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सीतारामन यांनी मांडला. विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेसचे मनीष तिवारी आणि द्रमुकचे अरुण नेहरू यांनी विधेयक मांडायला विरोध केला होता.    आदिवासी समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी द...

December 16, 2025 1:14 PM

views 35

लोकसभेत ‘सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५’ सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 'सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५' सादर केलं. हे विधेयक विमा कायदा १९३८, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा, १९५६ आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा, १९९९ यांची सुधारित आवृत्ती आहे. हे विधेयक सभागृहात सादर केलं जात असताना, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधेयकाला विरोध केला.   प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आजपर्यंत एकूण ७ लाख ८६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे ग्रामीण रस्ते बांधण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री ...

December 11, 2025 3:25 PM

views 28

एक देश एक निवडणूक विषयक समितीला मुदतवाढ

लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीचा कार्यकाळ लोकसभेनं आज वाढवला. पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी मांडला आणि लोकसभेनं तो आवाजी मतदानानं मंजूर केला.   भारतात ऊर्जेचा वापर वेगानं वाढत असून येत्या २० वर्षांत जागतिक पातळीवर ऊर्जेच्या वाढत्या मागणीत ३५ टक्के वाटा भारताचा असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक व...

December 9, 2025 1:42 PM

views 21

देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा ३५ कोटी ७ लाख टनांवर जाईल – केंद्रीय कृषीमंत्री

देशातलं अन्न धान्य उत्पादन यंदा ३५ कोटी ७ लाख टनांवर जाईल असा अंदाज असल्याचं आज  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितलं. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ पूर्णांक ६५ शतांश टक्के तर  2014-15 मधे  झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत बेचाळीस टक्के असल्याचं त्यांनी नमूद केलं.   महाराष्ट्र, पंजाब, जम्मूकाश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे धान्य उत्पादनात घट झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

December 8, 2025 9:25 AM

views 26

लोकसभेत आजपासून राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा

लोकसभेत आजपासून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत चर्चेला सुरुवात करतील. चर्चेसाठी दहा तासांचा वेळ देण्यात आला आहे.   लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आज वंदे मातरम गीतावर चर्चा आणि उद्या निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. 

December 7, 2025 7:23 PM

views 18

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय गीतावर चर्चा होणार

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं झाल्यानिमित्त उद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करणार आहेत. दुपारी बारा वाजता चर्चेला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक सुधारणा या विषयावर ९ डिसेंबरला चर्चा होणार असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत निश्चित झालं आहे.

December 1, 2025 7:46 PM

views 12

लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी कामकाजात अडथळे आले. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी १२, नंतर दुपारी २ वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं.   लोकसभेत आज कामकाज सुरू झालं तेव्हा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र, निवृत्त कर्नल सोना राम चौधरी, प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिली.   त्य...

August 21, 2025 3:05 PM

views 23

संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. २१ जुलैला हे अधिवेशन सुरु झालं होतं. आज सकाळी ११ वाजता लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, बिहार मतदारयाद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे गोंधळ सुरु झाला. त्यामुळे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं. १२ वाजता कामकाज सुुरु झाल्यावरही गोंधळ सुरुच राहिल्यानं अखेर लोकसभेचं कामकाज पुढच्या अधिवेशनापर्यंत संस्थगित करत असल्याचं सभापतींनी जाहीर केलं.    या अधिवेशनात लोक...

August 20, 2025 9:02 PM

views 15

ऑनलाइन गेमिंगबाबतचं विधेयक लोकसभेत मंजूर

विरोधकांच्या गदारोळातच, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग विधेयक, २०२५ लोकसभेत मांडलं. ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. याद्वारे गेमिंग क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक कायदेशीर चौकट तयार केली जाईल.   तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा, जाहिरातींच्या रूपाने पैशांच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदी करायची तरतूद या वि...

August 20, 2025 3:44 PM

views 15

लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब

बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत निदर्शनं सुरु केली. त्यामुळे सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक २०२५ लोकसभेत सादर केलं....