July 26, 2024 8:12 PM July 26, 2024 8:12 PM
9
लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा
लोकसभेचं कामकाज आज २०२४-२५ साठीच्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेनं सुरु झालं. चर्चेत भाग घेताना भाजपाचे जुगल किशोर म्हणाले की, हा अर्थसंकल्प आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा असून, तो जनतेसाठी फायद्याचा ठरेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सरकार देशाला स्वावलंबी बनवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचं पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले. हा अर्थसंकल्प बिहार आणि आंध्र प्रदेश केंद्रित असल्याचा विरोधकांचा दावा त्यांनी फेटाळून लावल...