October 5, 2025 7:04 PM October 5, 2025 7:04 PM

views 25

६८वी राष्ट्रकुल संसद परिषद : लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली भारताचं प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार

६८व्या राष्ट्रकुल संसद परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधीमंडळ लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह, २४ राज्यं आणि  केंद्रशासित प्रदेशातले मिळून ३६ तालिका अध्यक्ष आणि १६ सचिव यांचा या पथकात समावेश आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले डॉ अजित गोपछडे देखील परिषदेत भाग घेतील. बार्बाडोसमधे ब्रिजटाऊन इथं  आजपासून येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत ही परिषद चालेल. 

November 25, 2024 6:52 PM November 25, 2024 6:52 PM

views 6

सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन

संविधान सभेतल्या वादविवादापासून प्रेरणा घेत सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करावं, असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं. संविधान हे प्रत्येक नागरिकाचं असून त्यावर देशातल्या सर्व नागरिकांचा विश्वास असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

November 16, 2024 6:52 PM November 16, 2024 6:52 PM

views 13

देशात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्यात लेखा परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण – सभापती ओम बिर्ला

देशात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्यात लेखा परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत चौथ्या लेखा परीक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सार्वजनिक संपत्तीचा उपयोग नागरिकांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठीच केला जाईल याची हमी कॅगमुळे मिळते, असंही ते म्हणाले. देशातलं सुशासन आणि पारदर्शकता यात कॅग नं दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी लेखा परिक्षण दिन साजरा केला जातो. 

October 13, 2024 1:48 PM October 13, 2024 1:48 PM

views 9

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जिनेव्हा येथे होणाऱ्या IPU च्या 149 व्या बैठकीत भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

जिनिव्हा इथं आजपासून सुरु होणाऱ्या आंतर संसदीय संघाच्या एकशे एकोणपन्नासाव्या बैठकीला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. ही बैठक येत्या १७ तारखेपर्यंत असून शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या बैठकीची संकल्पना आहे. ओम बिर्ला, कार्यकारी मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार असून याव्यतिरिक्त जिनिव्हा मधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधणार आहेत. तसंच यानिमित्तानं विविध देशांच्या संसद प्रतिनिधींसह चर्चा करणार आहेत. भारताच...

October 1, 2024 2:39 PM October 1, 2024 2:39 PM

views 6

तरुणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हर घर दुर्गा हे अभियान मोलाची भूमिका बजावेल; लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी तरुणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हर घर दुर्गा हे अभियान मोलाची भूमिका बजावेल; असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल मुंबईत व्यक्त केला. कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा या अभियानाची सुरुवात बिर्ला यांच्या उपस्थितीत करण्यात आली; त्यावेळी ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देणात येणार आहे. यावेळी अभिनेत्री अदा शर्मा यांनी युवतींना स्वसंरक्षणाचं महत्...

September 24, 2024 1:46 PM September 24, 2024 1:46 PM

views 7

विधिमंडळांची कार्यक्षमता आणि कामकाज सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

विधानमंडळांची कार्यक्षमता आणि कामकाज सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा, असं मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रकुल देशांमधल्या लोकप्रतिनिधी गृहांच्या संघटनांचं १० वं संमेलन नवी दिल्लीत भरलं आहे. त्यात ते बोलत होते. विधानमंडळांनी विविध व्यासपीठांवर चर्चा करून तळागाळातल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांना आकार द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. तंत्रज्ञान आणि दळणवळणाची साधनं दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलेली आहेत अशावेळी लो...