August 12, 2025 8:19 PM August 12, 2025 8:19 PM

views 11

‘एक देश- एक निवडणूक’ अहवालासाठी संयुक्त समितीला लोकसभेची मुदतवाढ

‘एक देश- एक निवडणूक’ विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार हा अहवाल आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी सादर करता येईल.   भाजपा खासदार पी पी चौधरी यांनी आज लोकसभेत हा प्रस्ताव मांडला होता.

April 2, 2025 9:36 AM April 2, 2025 9:36 AM

views 7

वक्फ सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचाही कार्यभार असून ते आज सभागृहात हे विधेयक मांडतील.   विधेयकावर ८ तासांची चर्चा घेण्यात येईल आणि सभागृहाला आवश्यक वाटल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल असं त्यांनी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांना सांगितलं. या विधेयकाबाबत कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची सरकारची तयारी आहे, असं सांगून रीजीजू म्हणाले की विरोधी पक्षांना अनुनयाचं धोरण राबवायचं असल्याने ते या विधेयकाला...

February 13, 2025 9:01 PM February 13, 2025 9:01 PM

views 13

आयकर कायदा सोपा करणारं नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवीन आयकर विधेयक लोकसभेत मांडलं. विद्यमान आयकर कायदा सोपा आणि सुटसुटीत करण्यासाठी हे नवीन विधेयक सरकारनं सादर केलं आहे. हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याची शिफारस सीतारामन यांनी केली. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीनं अहवाल सादर करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.                                        नव्या आयकर विधेयकात धोरणात्तम बदल किंवा करांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल नाहीत. महत्त्वाचं म्हणजे यातून मागील वर्ष, assessment ...

February 13, 2025 12:57 PM February 13, 2025 12:57 PM

views 11

लोकसभेत प्राप्तिकर विधेयक २०२५ सादर होणार

प्राप्तिकर विधेयक २०२५ आज लोकसभेत मांडलं जाणार आहे. प्राप्तिकराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडण्यात येईल. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवं प्राप्तिकर विधेयक आणण्याची घोषणा केली होती. 

February 10, 2025 8:16 PM February 10, 2025 8:16 PM

views 6

आज लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा

लोकसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. २०२५-२६ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कॉरपोरेट्सना झुकतं माप देण्यात आलं असून जनतेच्या बेरोजगारी, महागाई या समस्यांकडे दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप द्रमुकचे दयानिधी मारन यांनी केला. भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयानं आजवरची नीचांकी पातळी गाठली आहे, अशी टीका त्यांनी केली.    नोटबंदीच्या वेळी जाहीर केलेलं कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, असं काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी सांगितलं. अर...

December 6, 2024 1:55 PM December 6, 2024 1:55 PM

views 9

लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाचखोरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आज गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. सभागृहाचं कामकाज आता सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.    आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी  सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली. त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करायला सांगितलं. परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्य...

December 2, 2024 7:32 PM December 2, 2024 7:32 PM

views 8

संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण तसंच संभल हिंसाचार यांच्यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.    लोकसभेत आज कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नात्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. दरम्यान विरोधकांनी आपल्या मुद्द्यांवरून सभापतींना स्थगन प्रस्ताव सादर केला, तो बिर्ला यांनी फेटाळून लावला....

August 8, 2024 3:58 PM August 8, 2024 3:58 PM

views 11

लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर

लोकसभेत आज वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलं. यात वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करुन राज्य वक्फ बोर्डांचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी हा कायदा आणण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षानं या विधेयकाला विरोध केला असून सर्वपक्षीय बैठक बोलाव...

August 7, 2024 3:37 PM August 7, 2024 3:37 PM

views 7

लोकसभेत २०२४ च्या अर्थ विधेयकावर चर्चा

लोकसभेत आज २०२४साठीच्या अर्थ विधेयकावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संध्याकाळी या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वर्षीच्या अर्थंसंकल्पातली ध्येयं साध्य करण्यासाठी हे अर्थविधेयक मदत करेल, असा विश्वास या चर्चेदरम्यान भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे मुहम्मद हमदुल्ला सयीद यांनी अर्थ विधेयकाला विरोध केला. हे सरकार कॉर्पोरेट कंपन्यांना करात अधिक सवलत देत असून सामान्य नागरिकांवरचा कर वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही चर्चा ...

August 5, 2024 1:06 PM August 5, 2024 1:06 PM

views 7

लोकसभेत आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 2024-25 साठीच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा

लोकसभेत आज आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 2024-25 साठीच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होईल. गोव्याच्या विधानसभेत अनुसूचित जमातींचं प्रतिनिधीत्व सुधारण्याबाबतचं विधेयकही सादर होणं अपेक्षित आहे. राज्यसभेत तेलक्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक सादर होणार असून कृषी मंत्रालयाच्या कामकाजाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.