August 25, 2024 8:25 PM August 25, 2024 8:25 PM

views 11

लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावर मंत्री चिराग पासवान यांची फेरनिवड

लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावर आज केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पाच वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली. रांची इथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हरयाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंडमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं पासवान यांनी सांगितलं.