August 3, 2024 12:58 PM

views 19

लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटल्यांचं निवारण

सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटल्यांचा निपटारा झाला असून दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले असं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.   सर्वोच्च न्यायालयाचं  ७५ वं   स्थापना वर्ष  साजरं  करण्यासाठी न्यायालयानं  हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अंतिम दिन असून या निमित्त आयोजित कार्यक्रमात मेघवाल बोलत होते. या लोक अदालतीमुळे सर्वांना सुलभ, जलद,  कमी खर्चिक न्याय मिळतो.  

July 24, 2024 1:08 PM

views 22

सर्वोच्च न्यायालयातर्फे २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन

सर्वोच्च न्यायालय २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन करणार आहे. त्यात प्रलंबित खटले मार्गी लावणं, सामंजस्यानं तोडगा काढणं याला प्राधान्य दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचं आयोजन होतंय. सर्वोच्च न्यायालयात खटले प्रलंबित असणाऱ्या याचिकाकर्त्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं आहे.