January 13, 2026 4:56 PM
82
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होणार
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा आज होणार आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषद आणि सव्वाशे पंचायत समित्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबईत संध्याकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोग वार्ताहर परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा करणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं कालच या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करायला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली होती.