November 4, 2025 7:43 PM November 4, 2025 7:43 PM
2.1K
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचं २ डिसेंबरला मतदान, मतमोजणी ३ डिसेंबर
राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानुसार येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार असून १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. १८ नोव्हेंबरला उमेदवार अर्जांची छाननी केली जाईल, २१ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेता येईल तसंच २६ नोव्हेंबरला उम...