September 16, 2025 3:52 PM September 16, 2025 3:52 PM

views 190

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं याआधी ठरवून दिलेली कालमर्यादा न पाळल्याबद्दल न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आणि ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. यापुढे यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असंही न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट केलं. तसंच वॉर्ड पुनर्रचनेची प्रक्रिया या वर्षीच्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, असंही न्यायालयानं सांगितलं. या निवडणुका चार मह...