July 12, 2024 1:18 PM July 12, 2024 1:18 PM
29
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
सर्वोच्च न्यायालयानं ईडीने दाखल केलेल्या कथित मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अंतरिम जामीन मंजूर केला. ईडीनं केलेल्या अटकेला आव्हान देणारी केजरीवाल यांची याचिका न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवली आहे. तथापि केजरीवाल यांना या प्रकरणी गेल्या २५ जूनला सी बी आय नं अटक केली होती, या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नसल्यानं ते कारागृहातच राहतील.